अ का पेला - A cappella
हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात.
२० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत नव्या पद्धतीने हा प्रकार प्रचलित झाले. या मध्ये शाळा -कॉलेजमधील विदयार्थी समुहात गाणी म्हणु लागली. वाद्याऐवजी टाळ्या, पायाचा ठेका याचा वापर सुरु झाला.
जसे तंत्रज्ञान विकसीत झाले आणि संपूर्ण गाणे हे सॉफ्टवेअर च्या माध्यमातून बनवेल जाऊ लागले तसा हा प्रकारही नवं रूप घेऊ लागला.
एकच व्यक्ती एक गाणे वाद्याशिवाय गाऊ लागला. म्हणजेच गाण्याचे शब्द, विविध वाद्यांचे आवाज वेगवेगळे नोंदवून सॉफ्टवेअर च्या माध्यमातून एकत्रित करू लागला. हा प्रकारची गाणी मला YouTube वर सापडली आणि मिपाकरांना सांगावी म्हणून हा लेखन प्रपंच. तुम्हालाही काही नव्या प्रकारची गाणी असतील तर प्रतिसादात लिहा.
मला आवडलेले इमॅजिन ड्रॅगन या अल्बमचे जेरेड हैलीने बनविलेले हे मेलडी गाणे
आपली मराठी मंडळी पण यात मागे नाहीयेत त्यांचे पण आवडलेले हे गाणे
जुन्या जाहिरातींचा AIB बनविलेले हे गाणे पण आवडले.